अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेली आराध्या पटेल 'तू धडकन मैं दिल' या मालिकेत दिसणार

Webdunia
शनिवार, 21 जून 2025 (18:31 IST)
स्टार प्लस वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या 'तू धडकन मैं दिल' या नव्या मालिकेत एक हृदयस्पर्शी कथा गुंफलेली आहे. या कथेत एका लहान मुलीची निरागसता आणि दृढनिश्चय नेमकेपणाने टिपला आहे. ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे बाल अभिनेत्री आराध्या पटेल, जी दूरचित्रवाणी मालिकेत मुख्य भूमिकेत पदार्पण करत आहे. आराध्या दूरचित्रवाणी मालिकेत नव्याने प्रवेश करत असली तरी आराध्या ही मनोरंजन उद्योगातील एक परिचित चेहरा आहे. प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड जाहिरातींमधील एका जाहिरातीत बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती झळकल्याने तिला नवी ओळख मिळाली, आणि तिने देशभरातील रसिक-प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली.
 
आणि आता आराध्या स्टार प्लस वाहिनीवरील बहुप्रतिक्षित 'तू धडकन मैं दिल' या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकण्याकरता सज्ज झाली आहे. या मालिकेच्या अलीकडेच दाखल झालेल्या प्रोमोला इंटरनेटवर मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि ‘दिल’च्या व्यक्तिरेखेची चर्चा सर्वत्र चांगलीच रंगली आहे.
 
'तू धडकन मैं दिल' या मालिकेत, आराध्या, मोठ्या धैर्याची मुलगी आहे, जी अतिशय निरागसतेने जीवनातील अनेक चढ-उतारांना तोंड देते. या मालिकेत प्रेम, कौटुंबिक बंधन आणि अतूट नातेसंबंध या सर्व गोष्टींचा वेध घेतला जात असून या सर्व गोष्टी लहान मुलीच्या दृष्टिकोनातून टिपल्या आहेत. आराध्याने 'दिल' ची साकारलेली व्यक्तिरेखा प्रामाणिक आणि मोहक आहे, यामुळे ही व्यक्तिरेखा सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना भावते आणि सर्वांकरता ही कथा प्रेरणादायी बनते.
 
मालिकेतील हृदयस्पर्शी कथाकथन आणि आराध्या पटेलचा आकर्षक अभिनय यामुळे, 'तू धडकन मैं दिल' अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होईल. याचे कारण हा कार्यक्रम जीवनातील आव्हाने आणि आनंद याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन प्रदान करतो. प्रेक्षकांना प्रेम आणि चिकाटी यांमध्ये जी ताकद असते, त्याची आठवण करून देतो. 
 
२३ जूनपासून केवळ स्टार प्लस वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता सुरू होणारी 'तू धडकन मैं दिल' ही मालिका पाहायला विसरू नका.
ALSO READ: Ahmedabad plane crash चित्रपट निर्मात्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी, डीएनए अहवालातून उघड

संबंधित माहिती

पुढील लेख