अभिनेता वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज साहू यांनी घेतला अखेरचा श्वास, अभिनेता भावुक झाले

बुधवार, 19 जानेवारी 2022 (11:40 IST)
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज साहू यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मनोज साहू बराच काळ वरुण धवनसाठी काम करत होते आणि वरुण त्याला मित्र मानायचे. वृत्तानुसार,आदल्या दिवशी मनोज साहू एका जाहिरात चित्रपटाच्या शूटिंगसाठी वरुण धवनला मेहबूब स्टुडिओच्या बाहेर सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर अचानक त्यांना छातीत दुखू लागलं आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. मेहबूब स्टुडिओबाहेर मनोज साहू यांना हृदयविकाराचा झटका आला. वरुण धवनने काही लोकांच्या मदतीने त्याला लीलावती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रिपोर्ट्सनुसार, लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी मनोज साहू यांचा मृत्यू झाला होता. वरुण धवन काही वेळापूर्वी लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर दिसले . हॉस्पिटलबाहेर काही लोकांशी संवाद साधत असलेला वरुण धवन एकदम शांत दिसत होते. वरुण धवनची अवस्था पाहून मनोज साहू त्याच्यासाठी किती महत्त्वाचे होते हे स्पष्ट होते. वरुण धवन आणि त्याची टीम हॉस्पिटलच्या सर्व औपचारिकता पूर्ण करत आहे.

 वरुण धवनला मनोज साहूच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. मनोज साहूच्या मृत्यूने वरुण धवन भावुक झाले आहे. मनोज गेल्या 15 वर्षांपासून वरुण धवनसाठी काम करत होते . मनोज साहूला दोन मुली असून मनोज गेल्यानंतर त्याचे काय होणार याची चिंता वरुण धवनला सतावत आहे. वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी अभिनेत्याला फोन केला आणि त्याला वचन दिले की मनोज साहूच्या कुटुंबाची काळजी पूर्णपणे घेतली जाईल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती