तसेच आज सर्वांनाच दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज माहित आहे. त्यांनी तमिळ इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खलनायकी भूमिकांसाठी हा अभिनेता खूप लोकप्रिय आहे. प्रकाशने त्याच्या नकारात्मक भूमिकांमुळे केवळ तमिळ, तेलगू इंडस्ट्रीमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्धी मिळवली आहे. याशिवाय ते राजकारणातही सक्रिय आहे. तसेच आज म्हणजेच २६ मार्च रोजी त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रकाश राज करोडोंचे मालक आहे. पण सुरुवातीच्या काळात तो ३०० रुपये दरमहा स्टेज शो करत असे. या अभिनेत्याने कठोर परिश्रम करून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावले. आज प्रकाश राज त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. प्रकाश यांनी १९८८ मध्ये मिथिलेया सीथेयारू या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी तमिळ आणि कन्नडसह अनेक तेलुगू चित्रपट केले आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने वॉन्टेड, सिंघम, एंटरटेनमेंट सारखे हिट चित्रपट केले आहे. १९९८ मध्ये इरुवर चित्रपटासाठी प्रकाश यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय, 'कांचिवराम' या तमिळ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. निर्माता म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कन्नड चित्रपट 'पुट्टक्काना हायवे'साठी त्यांना सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी ३९८ चित्रपटांमध्ये काम केले आहे.