चित्रपट विभागातील सन्मानाच्या अशा ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचा डंका वाजताना दिसत आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकरचा सिनेमा न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
यशराज कऱ्हाडे दिग्दर्शित म्होरक्या या चित्रपटाला विशेष पुरस्कार मिळाला आहे. तर, मृत्युभोग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे या दिग्दर्शकाचा मयत हा लघुपट सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे. नागराज मंजुळेंना पावसाचा निबंध या लघुपटासाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. तर मॉम या चित्रपटातील अभिनयासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कारावर उमटलेला मराठी ठसा-
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)