आपल्या चित्रपटांचा प्रचार करण्यासाठी आमिर खान अधिक दिवस घेतो. 35 ते 50 दिवस तर तो चित्रपटाच्या प्रचारासाठी देतोच. सलमान 25 दिवस, अक्षयकुमार 15 ते 18 दिवस, अजय देवगण 20 ते 25 दिवस अगोदर चित्रपटाच्या प्रचाराचा नारळ फोडतात. यामध्ये शाहरुखने ‘हॅपी न्यू इयर’चा तीन महिने प्रचार करत कळस गाठला होता. वरुण धवन, आलिया भट्ट , श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा या नवोदित स्टार्सनीदेखील चार महिन्यांपर्यंत आपल्या चित्रपटांचे प्रमोशन केलेले आहे. शाहरुखचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा पहिला प्रोमो दिवाळीत रिलीज होणार्या सलमानच्या चित्रपटासोबत दाखवण्यात येणार आहे.