‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती.
19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने 2012 मध्ये सर्वाधिक कमाई केली होती. ऋषी कपूर, सना सईद, रोनीत रॉय, राम कपूर आणि फरिदा जलाल यांनीही या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सिनेमाच्या सिक्वेलची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्मस आणि शाहरुख खानच्या रेड चिलीज यांच्या सहनिर्मितीने होणार आहे.