‘शिवाय’ मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल

सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (11:01 IST)
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अजय देवगण ‘शिवाय’ चित्रपट मुलांसाठी प्रेरणादायी ठरु शकेल असे वाटते. अजयचा ‘शिवाय’ टीव्ही शो ‘शिवा’शी संबंधित आहे आणि हा चित्रपट मुलांना खूप आवडेल असेही त्याला वाटते. 
 
अजय म्हणाला, ‘मूल्य प्रणाली आणि विचारांच्या दृष्टीने ‘शिवाय’ आणि ‘शिवा’मध्ये साम्य आहे. कुटुंब आणि मित्रांवर प्रेम हा विषय दोन्हीमध्ये आहे. समाजातील समतोल राहण्यासाठी वाईट शक्तिचा सामना दाखवण्यात आलाय. मला खात्री वाटते की मुलांना हा चित्रपट आवडेल आणि प्रेरणादायी ठरेल. 
 
जसा ‘शिवा’चा स्वीकार केला तसा ‘शिवाय’चाही स्वीकार करतील. ‘शिवाय’ चित्रपटात अजय देवगणने काम तर केले आहेच, पण या चित्रपटाचा तो निङ्र्काता आणि दिग्दर्शकही आहे. 28 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. अजयसोबत ‘शिवाय’मध्ये सायेशा सैगल, वीर दास आणि गिरीश कर्नाड यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

वेबदुनिया वर वाचा