‘वेलकम बॅक’मधून 15 शब्द सेन्सॉर बोर्डाने वगळले

शनिवार, 5 सप्टेंबर 2015 (11:43 IST)
नवीन दिग्दर्शक आणि निर्माते फार चांगल्या कथा सादर करत आहेत. हे चित्रपट उत्कंठापूर्ण आहेत, चांगला विचार देणारे आहेत त्यामुळे प्रेक्षकांनाही ते नाकारता येणार नाहीत मात्र त्यातून कमाई कशी वाढवायची याचे तंत्र आपल्यालाच शोधावे लागणार आहे.
 
लवकरच प्रदर्शित होणार्‍या वेलकम बॅक या चित्रपटातून सेन्सॉर बोर्डाने 15 शब्द वगळले आहेत. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी नाराजी दर्शवली आहे.
 
चित्रपटातून सेन्सॉर बोर्डाने ‘साला’ यासारखा शब्द हटवण्यास सांगितले आणि आम्ही ते स्वीकारले, पण सिनेमातून इतर शब्द हटवणे चुकीचे आहे. ते शब्द का वापरले हे समजावण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना ते पटले नसल्याचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी सांगितले.
 
4 सप्टेंबर रोजी मल्टिस्टारर फिल्म वेलकम बॅक प्रदर्शित होणार असून त्यात अनिल कपूर, नाना पाटेकर, जॉन अब्राहम, परेश रावल, नासिरुद्दीन शाह, श्रुती हसन, शायनी अहुजा, डिंपल कपाडिया आणि अंकित श्रीवास्तव यांची प्रमुख भूमिका आहे.
 

वेबदुनिया वर वाचा