‘ये दिल है मुश्किल’मध्ये शाहरुख

गुरूवार, 25 ऑगस्ट 2016 (14:38 IST)
शाहरुख खान आणि करण जोहरची सुप्रसिद्ध जोडी 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 
 
2010 ला करण जोहर आणि शाहरुखचा ‘माय नेम इज खान’ हा सिनेमा आला होता. त्यानंतर शाहरुख आणि करण जोहरच्या मैत्रीत काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा बॅालिवूडमध्ये सुरू होती. या चर्चेला महत्त्व न देता, पुन्हा एकदा करण जोहरच्या येणार्‍या ‘ये दिल है मुश्किल’ या सिनेमामध्ये शाहरुख महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला  मिळणार आहे.
 
ही भूमिका आधी सैफ अली खान करणार होता, पण हाताला दुखापत झाल्यामुळे सैफऐवजी शाहरुख खान करणार असल्याची चर्चा आहे. अद्याप कोणीही याची पुष्टी केलेली नाही. 
 
जर शाहरुखने या सिनेमासाठी होकार दिला तर करण जोहर आणि शाहरुखचा हा पाचवा सिनेमा असेल.
 

वेबदुनिया वर वाचा