‘बिईंग ह्युमन’ची नेपाळला मदत नाही

मंगळवार, 5 मे 2015 (15:10 IST)
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे ओढावलेल्या संकटानंतर आपदग्रस्तांना ‘बिईंग ह्युमन’तर्फे कोणत्याही पद्धतीची मदत करण्यात आलेली नाही, असं सिनेस्टार सलमान खाननं स्पष्ट केलंय. कोर्टामध्ये स्वत:ला ‘इंडियन’ म्हणणार्‍या सलमानच्या म्हणण्यानुसार आपली एनजीओ ‘बीईंग ह्युमन’ केवळ भारतात काम करते. नेपाळमध्ये ओढावलेल्या नैसर्गिक संकटानंतर नेपाळला आपण आणि बिईंग ह्युमननं कोणतीही मदत केलेली नाही. बीईंग ह्युमननं नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदतीसाठी पैसे दान दिल्याच्या काही खोटय़ा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या बातम्या खोटय़ा आहेत, असं सलमाननं आपल्या फेसबुक अकाऊंटवर म्हटलंय. 
 
रात्री उशिरा सलमाननं हा खुलासा केलाय. ज्या बॉलिवूड हस्तींनी नेपाळला मदत पुरविली त्या हस्तींमध्ये सलमानच्या नावाचाही समावेश होता. पण, सलमाननंच याचं खंडन केलंय. पण, यापुढेही बिईंग ह्युमन नेपाळच्या आपदग्रस्तांना मदत करणार किंवा नाही, याबद्दल मात्र सलमाननं काही म्हटलेलं नाही.

वेबदुनिया वर वाचा