‘तलवार’च्या पात्याला कोटय़वधींची धार

मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (12:26 IST)
आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडावर आधारित, समीक्षकांकडून कौतुकाची पावती मिळालेला मेघना गुलजार दिग्दर्शित ‘तलवार’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला आहे. 
 
शुक्रवारी म्हणजे पहिल्या दिवशी चित्रपटाने तिकीटबारीवर तीन कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, इरफान खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘माऊथ पब्लिसिटीच्या बळावर तलवार चित्रपटाने चांगली कमाई केली आहे, शिवाय समीक्षकांनी ‘तलवार’ला गौरवलं आहे’ असं चित्रपटाच्या प्रवक्यांनी सांगितलं. 
 
अक्षयकुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’, हॉलिवूडचा ‘दि मार्टियन’ आणि अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ’सोबत प्रदर्शित झालेल्या ‘तलवार’ने पहिल्याच दिवशी घेतलेल्या कोटींच्या उड्डाणामुळे चित्रपटाच्या टीमनेही आनंद व्यक्त केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा