स्वत: अक्षयने जेट-स्कीवर स्वार आणि मोठे केस असा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. कॅमियो रोलचे शूटिंग. माझा मित्र साजिद, जॉन, वरुण, जॅकीला माझ्याकडून खूप शुभेच्छा, ढिशूम, असे या फोटोसह लिहिले आहे. सध्या चित्रपटाचे कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. निर्माता-दिग्दर्शकांना चित्रपटात नवे काहीतरी करायचे होते. म्हणूनच त्यांनी अक्षयला कॅमियो रोलमध्ये आणले. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे अक्षय आणि जॉन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. याशिवाय लवकरच अक्षयकुमारचा ‘रुस्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.