‘एअरलिफ्ट’ 200 कोटींच्या घरात

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’ सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाने देशातील कमाईत 110 कोटींचा आकडा पार केला आहे. तर परदेशातील कमाई मिळून ‘एअरलिफ्ट’ने 190 कोटींचा टप्पा गाठला आहे. जगभरात या सिनेमाने 186.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘एअरलिफ्ट’ हा अक्षय कुमारचा चौथा सिनेमा आहे, ज्याने 100 कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. एअरलिफ्ट हा सिनेमा 26 जानेवारीला रिलीज झाला होता. या सिनेमात देशप्रेम, सत्य घटना, अक्षयकुमारची भूमिका यामुळे चाहत्यांनी सिनेमाला चांगलंच डोक्यावर घेतला आहे. राजा कृष्ण मेनन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाला मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल अक्षयकुमारने आनंद व्यक्त केला आहे.

‘एअरलिफ्ट’ला अपेक्षापेक्षा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं अक्षयने सांगितलं. सत्य घटनांवर आधारित सिनेमे हे परिणामकारक असतात. त्यामुळे अशा सिनेमांना माझे प्राधान्य राहील. वास्तववादी सिनेमांना तुलनेने प्रतिसाद कमी मिळतो, मात्र ‘एअरलिफ्ट’ने हा अंदाज खोडून टाकला, असं अक्षय म्हणाला.

सुमारे 26 वर्षापूर्वी 1990 मध्ये कुवेत आणि इराकमध्ये झालेल्या युद्धादरम्यान, कुवेतमध्ये 1 लाख 70 हजार भारतीय अडकले होते. त्यावेळी त्यांची सुटका कशी झाली, यावर आधारित एअरलिफ्ट सिनेमाचं कथानक आहे.

वेबदुनिया वर वाचा