हृतिककडे सुझानने मागितली तब्बल 400 कोटींची पोटगी!

मंगळवार, 29 जुलै 2014 (17:51 IST)
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा हादरला आहे. पत्नी सुझानने त्याला काडीमोड घेण्याचा निर्णय घेतल्याने हृतिक पहिल्याला हादरला होता. आता मात्र, सुझानने आपल्या पतीला तब्बल 400 कोटी रुपयांची पोटगी मागितली आहे. सुझान लवकरच हृतिक कायदेशीररित्या विभक्त होणार आहे.
 
दरम्यान, हृतिकने सुझानसोबत पॅच अप करण्याचाही प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या वाढदिवसानिमित्त हृतिक आणि सुझानने एकत्र येऊन आपली जबाबदारी पार पाडली होती. 17 वर्षांच्या संबंधांनंतर हृतिक आणि सुझानने डिसेंबर 2013 मध्ये काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला.

वेबदुनिया वर वाचा