मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात गीता आणि हरभजन विवाहबद्ध झाले. त्याआधी दोन ते तीन वर्षापासून दोघांच्या प्रेमसंबंधांची माध्यमांमध्ये चर्चा होती. हिंदी चित्रपटात कारकिर्द करण्यासाठी लंडनहून आलेल्या गीताने बॉलिवूडमधल्या काही सिनेमांमध्ये काम केले मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. या दरम्यान तिची हरभजनबरोबर ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.