असहिष्णुतेच्या मुद्द्यावर देश सोडून जाण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आमीरवर प्रचंड टीकाही झाली होती. अनेक लोकांनी ‘स्नॅपडील‘चे ऍप्लिकेशनही मोबाइलमधून काढून टाकले होते. याचा फटका बसल्याने ‘स्नॅपडील‘ने आमीरला जाहिरातीत दाखविणे बंद केले होते आणि आता कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.