सोनाक्षीने अलीकडेच आपली काही छायाचित्रे सोशल साइटस्वर अपलोड केली आहेत. या छायाचित्रांत सोनाक्षीचा हेअरकट बदलेला दिसतो. तिने आपले केस कापले आहेत आणि स्टालीश बॉब कट केली आहे. सोनाक्षीने आपल्या टिटरवर ही छायाचित्रे अपलोड करून लिहिले की, ‘खूप वर्षानी छोटे केस..!’ सोनाक्षीचा हा हेअरकट क्रोमाके सलूनची हेअर ड्रेसर कांता मोटवणी यांनी केली आहे.
सोनाक्षीचा हा लूक कोणत्या सिनेमासाठी आहे, हे अद्याप कळालेले नाहीये. तिने केवळ लूक बदलण्यासाठी हेअरकट केली आहे, हेदेखील स्पष्ट झालेले नाहीये. असो, परंतु हा नवीन लूक सोनाक्षीला शोभतोय हे नक्की.