सिंदूर भरल्यामुळे जावं लागेल नरकात? सनाने दिला जवाब

सोमवार, 8 ऑगस्ट 2016 (14:46 IST)
टीव्ही कलाकार सना अमीन शेख हिला तिच्या भूमिकेसाठी सिंदूर भरल्यामुळे नॉन-मुस्लिम म्हटले जात होते. सोशल मीडियावर धार्मिक गुरुंनी सना शेखला भांगेत सिंदूर भरल्यामुळे खूप फटकारले. यावर सना ने बिंदास आपले मत मांडले.
 
सना सध्या एका टीव्ही चॅनेल मालिका 'कृष्णादासी' यात हिंदू मुलीच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी तिला सिंदूर लावावं लागत आणि मंगळसूत्रदेखील घालावं लागत. सनाने आपल्या फेसबुक पेजवर या मालिकेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. परंतू तिचे हे फोटो तिच्या काही फॅन्स आणि धर्म गुरुंना आवडलेले नाही.
तिच्या एक चाहत्याने म्हटले की "आपण मुस्लिम असून सिंदुराने भांग भरता" या प्रकारच्या कमेंट्सनंतर सना ने सोशल मीडियावर उत्तर देत म्हटले की, "लोकं मला विचारतात की मी सिंदुराने भांग का भरते? मी केस धुते तेव्हा हे मिटून जातं आणि मिटत नसेल तरी मी स्वत:च्या मर्जीने सिंदूर भरतं असेन तर काय मी नॉन-मुस्लिम होऊन जाते."  
 
"याने काय मी कमी मुस्लिम होतो. माझी आई आणि आजीदेखील मंगळसूत्र घालायच्या... जसे हिंदू घालतात. याने काय आम्ही कमी मुस्लिम होऊन जातो? काय अल्लाह मला नरकात पाठवणार कारण की मी सिंदूर भरते? आणि आपण जे फेसबुक आणि इतर जागी आपलं वेळ घालवतं आहात ते जन्नतमध्ये जाणार आहे का?"
 
फोटो सौजन्य : सोशल मीडिया 

वेबदुनिया वर वाचा