सलमान-जॅकलिन मैत्रीच्याही पुढे?

शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (15:59 IST)
बॉलिवूडच गल्लीगल्लीत सध्या चर्चा आहे, ती सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची. या दोघांचे संबंध म्हणे मैत्रीच्याही पुढे गेले आहेत. ‘किक’ रिलीज झाला तेव्हाच या दोघांत गुटर्रगू सुरू असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यात आता या बातमीला अजून हवा मिळाली, ती सलमानने ‘किक'च्या एका इव्हेंटदरम्यान, जॅकलिनला किस केलं तेव्हा. एका बॉलिवूड खबर्‍याने तर असंही सांगितलं की, सलमानने त्याच्या एका मित्राला, आपण जॅकलिनला घेऊन, त्याला भेटायला येत आहे, असा फोन केला होता.

रात्रीचे तीन वाजले होते. आणि त्या वेळी जॅकलिनसोबत सलमानला पाहून सलमानचा तो मित्रही आश्र्चर्यचकित झाला होता. किकच्या प्रमोशनदरम्यानदेखील सलमान-जॅकलिनची एकमेकांप्रतीची ओढ लपून राहिली नव्हती बरं का? काही दिवसांपूर्वी तर अशीही अफवा होती की, सलमानने जॅकलिनला वांद्रे येथे एक फ्लॅट घेऊन दिला म्हणून. नंतर जॅकलिनने या अफवेचं खंडन केलं, ही बाब अलहिदा. पण या सगळ्या घडामोडी या दोघांतलं नातं अधिकच दृढ होत असल्याचं निदर्शक आहेत, हे मात्र खरं. तुम्हाला का वाटतं?

वेबदुनिया वर वाचा