सलमानने काही दिवसांपूर्वी बजरंगी भाईजानची पेंटिंग बनवून करिनाला दाखवली होती. करिनाला त्याची पेंटिंग खूपच आवडली आणि म्हणाली, ही फार सुंदर पेंटिंग आहे आणि मला ती आवडली आहे. मग काय सलमानने तिला लगचेच म्हटलं की, ही पेंटिंग आता तुझी झाली.
सलमान खानला विचारलं की तू खरंच करिनाला ती पेंटिंग गिफ्ट करणार का? तेव्हा सलमानने त्याच्या वॉण्टेड सिनेमाच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं की, ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद मैं खुद की भी नहीं सुनता’. सलमान आणि करिना कपूरचा ‘बजरंगी भाईजान’ सिनेमा या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.