सलमानच्या बहिणीचे नाव 'अर्पिता' कसे पडले?

शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (11:57 IST)
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता हिचे लग्न सध्या बरेच चर्चेत आहे. हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये पार पडलेल्या लग्नात बॉलीवूड आणि कॉर्पोरेट जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. अर्पिता सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे. अर्पिता खूप लहान असताना खान कुटुंबात सामील झाली होती. खान कुटुंबात दाखल झाल्यानंतर तिचे अर्पिता हे नाव कुणी आणि कसे ठेवले, याविषयी फार कमी जणांना ठाऊक आहे. सलमानच्या या लाडक्या बहिणीचे 'अर्पिता' हे नाव प्रसिद्ध व्यंगचित्रकार शरद जोशी यांनी ठेवले आहे. अर्पिताला सलमानचे वडील सलीम खान यांनी १९८१ मध्ये दत्तक घेतले होते. त्यावेळी सलीम खान यांच्यासोबत इंदूर येथील होळकर कॉलेजमधील त्यांचे मित्र शरद जोशी हजर होते. तेव्हा सलीम यांनी शरद जोशींकडे आपल्या मुलीचे नाव ठेवण्याची विनंती केली. शरद जोशी यांनी सलीम खान यांना म्हटले की, ही मुलगी तुम्हाला अर्पित झाली आहे, त्यामुळे हिचे नाव 'अर्पिता' ठेवायला पाहिजे. अशाप्रकारे ही अनाथ मुलगी सलीम खान यांची मुलगी 'अर्पिता खान' झाली.

वेबदुनिया वर वाचा