साधारणपणे लोकं फिट राहण्यासाठी घरगुती जेवणाला प्राधान्य देतात पण सनी लिओन आता घर बनलेले पदार्थ मुळीच खाणार नाही. कारण आता तिचं जेवण फिटनेस फूड कंपनीकडून येणार.
सनीला जेवढ्या कॅलरीजची आवश्यकता आहे, तेवढ्याच कॅलरीचा नाश्ता, लंच, डिनर आणि इतर आहार ही कंपनी पुरवणार आहे. सनीला पूर्णपणे हेल्दी फूड देण्यात येईल ज्याने ती स्लिम आणि फीट राहील.