सनीचे नवे गाणे ‘बेबी डॉल’ रिटर्न्‍स

सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (11:13 IST)
रागिणी एमएमएस-2 या चित्रपटांतील प्रसिद्ध झालेले ‘बेबी डॉल’ हे गाणे, खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं पुन्हा एकदा सनी लिओनच्या आगामी ‘मस्तीजादे’ या चित्रपटातही दिसणार आहे.
 
निर्माते मिलाप झावेरी यांच्या आगामी ‘मस्तीजादे’ या चित्रपटासाठी रागिणी एमएमएस-2 मधील अतिशय लोकप्रिय झालेले ‘बेबी डॉल’ हे गाणे त्यांनी टी-सीरिजकडून विकत घेतल्याचं समजतंय. 
 
‘बेबी डॉल’ हे गाणं मीत ब्रदर्स यांनी बनवले होतं. ‘मस्तीजादे’ हा निर्माते मिलाप झावेरी यांच्या येणारा पुढील चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री सनी लिओन आणि अभिनेता तुषार कपूर दिसतील. 
 

वेबदुनिया वर वाचा