संजुबाबा ‘सुटला’; अधिकारी ‘सापडले’?

शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015 (12:35 IST)
फर्लोप्रश्नी अभिनेता संजय दत्त हा निर्दोष असल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्या गोंधळामुळे तो दोन दिवस बाहेर राहिल्यामुळे आता संबंधित अधिकाºयांवर कारवाई होणार आहे.

फलोर्ची मुदत संपल्यावर येरवडा तुरुंगात दाखल होण्याकरिता ८ जानेवारीला सायंकाळी संजय पोहोचला. मात्र तोपर्यंत त्याने केलेल्या रजेच्या नव्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकाºयांनी कुठलाही निर्णय घेतला नव्हता.

त्यामुळे तो दोन दिवस जेलबाहेर राहिला. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये संजयची चूक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा