पॅरोलवर येरवडा कारागृहातून सुटून आलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त व संजय गुप्ता यांनी संजय शिक्षा भोगून परत आल्यानंतर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला असून हा चित्रपट अँक्शन थ्रिलर असेल असे समजते. संजय दत्तचा हा कमबॅक चित्रपट असेल. संजय दत्त आणि संजय गुप्ता यांची जोडी तशी जुनीच आहे. संजयचा पहिला चित्रपट गुप्ताबरोबरच झाला होता.