शेर्लिनचा नवा 'हॉट' अवतार !

शेर्लिन चोप्राला नव्या अवतारात पाहिलंय काय? ती आता आधीपेक्षा भलतीच 'हॉट' दिसायला लागलीय. शरीरावरची तिची 'मालमत्ता'ही भलतीच वाढली आहे. अर्थात, त्यासाठी तिने जाणीवपूर्वक प्रयत्नही केलेत. बॉलीवूडमध्ये आपला 'युएसपी' म्हणजे युनिक सेलिंग पॉईंट काय आहे हे शेर्लिनला पक्क माहिती आहे. म्हणूनच तिने आपले स्तन मोठे दिसावेत यासाठी सर्जरी करून घेतली आहे. या उद्योगाने तिचे केवळ स्तनच वाढले, असे नाही तर तिचा आत्मविश्वासही कमालीचा दुणावला आहे. आता आपलं करीयर उंच आकाशात झेप घेईल असं तिला वाटतंय. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने या सर्जरीमागचं कारणही स्पष्ट केलं. ती म्हणते, आधी मला मुलगा असल्यासारखं वाटायचं. स्तन प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली आणि मला माझं व्यक्तिमत्व सापडलं.' पण आता ती या विषयावर फार काही बोलू इच्छित नाही. शेर्लिन आता शाहिद कपूरच्या दिल बोले हडिप्पामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत चमकत आहे.

वेबदुनिया वर वाचा