शुक्रवारी रिलीज होणार ‘वन्स अपॉन ए टाईम’

वेबदुनिया

गुरूवार, 29 जुलै 2010 (12:36 IST)
अजय देवगन व इमरान हाश्मी यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट वन्स अपॉन ए टाईम येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाला हिरवा कंदील दिल्यानंतर हा निर्णय घेण्‍यात आला.

गँगस्टर हाजी मस्तान याच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीरेखेवर आधारीत नसल्याचे चित्रपटापूर्वी दाखवले जाणार असल्याचे निर्मात्यांनी मान्य केल्यानंतर न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची परवानगी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा