शाहिद आणि करिना एकाच हॉटेलात!

शुक्रवार, 8 मे 2015 (11:45 IST)
बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर सध्या ‘उडता पंजाब’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शाहिद-करिनासह सिनेमाची सर्व टीम अमृतसरच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. मात्र दोघं एकमेकांसमोर आल्याचं पाहण्यात आलेलं नाही. सिनेमाच्या शूटिंगमध्येही हे दोघं एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीनं सिनेमाचं शेडय़ूल आखण्यात आलं आहे. म्हणूनच जेव्हा करिनाचे शॉट संपतात तेव्हा शाहिदची सेटवर एंट्री होते. तसंच सिनेमात शाहिद आणि करिनाचा एकत्र एकही सिन असणार नाही. 
 
‘उडता पंजाब’ सिनेमात आलिया भट्ट आणि दिलजित दोसांझ मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेक चौबे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. सिनेमा यावर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा