शाहरुख खानला ओळखू शकले नव्हते- अनुष्का

WD
यशराज फिल्म्सच्या प्रचारकार्यात 'रब ने बना दी जोडी'ची अभिनेत्री अनुष्का शर्माला ‍मीडियापासून जरा लांबच ठेवण्यात आले. जेव्हा फिल्म प्रदर्शित होऊन हिट झाली तेव्हा अनुष्काबाबत अधिक जाणून घेण्यासाठी चाहते बैचेन झाले. तेव्हा 18 डिसेंबरच्या रात्री अनुष्काला मीडियासमोर आणण्यात आले.

WDWD
19 वर्षीय अनुष्कासाठी शाहरुखसोबत काम करणे हे स्वप्न साक्षात साकार होण्यासारखे आहे. बेंगळूरु येथील राहणारी अनुष्का लहानपणापासून शाहरुखची फॅन आहे. अनुष्काने सांगितले की, शाहरुखने शूटिंग दरम्यान तिला मदत केली व मात्र शाहरूखचा अजुनही विश्वास बसत नाही की, अभिनयाच्या क्षेत्रात अनुष्का नवीन आहे.

WDWD
अनुष्काला आजही तो पहिला आठवतो, तो म्हणजे ती पहिल्यांदा शाहरुखशी भेटली होती. तेव्हा ती किंग खानला ओळखूच शकली नाही. कारण तेव्हा शाहरूख सुरिंदर साहनीच्या रूपात होता. तो शाउरूख खान असल्याचे सांगण्यात येऊनही अनुष्का बराच वेळ त्याला निहाळत राहिली.

WDWD
'रब ने बना दी जोडी' अनुष्काच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा होत आहे. शाहरुख खान सारख्या स्टारशी पूर्ण आत्मविश्वासाने सामना केला आहे. बॉलीवुडमधील विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनुष्काचे भविष्य उज्ज्वल आहे.

WD
अनुष्का फिल्म साइन करताना कुठलीच घाई करत नाही. आधी ती रोल, बॅनर, दिग्दर्शक यांना भेटून चित्रपटाची निवड करणार आहे. कदाचित यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटही ती साइन करेल!

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा