विनोद खन्नांचा 'बंगला बना न्यारा'

IFMIFM
मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, मुंबई घर घेण्याचे दिव्य सामान्य माणूस कधीच करू शकणार नाही. परंतु, चित्रपट कलाकारांसाठी मुंबईत घर घेणे किती सोपी गोष्ट आहे, हे नुकतेच उघड झाले आहे.

सध्या बॅलीवूडमध्ये चर्चा कोणत्या चित्रपटाची नाही किंवा कोणाच्या अफेयर्सची. चर्चा चालली आहे ती विनोद खन्ना यांच्या प्लाजो बिल्डिंगच्या नव्या घराची.

या घरासाठी खन्नांनी 30 कोटी मोजलेत. आलिशान असणार्‍या या घरात सर्व सोय‍ी सुविधा आहेत. या बिल्डींगमधील बी विंगमध्ये खन्नांनी हे घर विकत घेतले आहे.

छान समुद्र किनार्‍या शेजारी आपले घर असावे अशी खन्नांची इच्छा यानंतर पूर्णं झाली आहे. परंतु, आता घर घेण्यात पैसे संपल्याने बिचार्‍या विनोद खन्नांना आता छोट्या पडद्याकडे वळावे लागले आहे. याची उघड कबुलीही ते देत आहेत.

अमिताभ आपल्या समकालीन कलाकार असताना त्याला चित्रपटात चांगल्या ऑफर्स मिळतात आणि आपल्याला का नाही हे त्यांना अजून उमगले नसून, सध्या तरी आपण फक्त पैशासाठी छोट्या पडद्याकडे वळल्याचे विनोद खन्नांनी कबूल केले आहे.

वेबदुनिया वर वाचा