वरुण म्हणतो, आय एम इन लव्ह

बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (12:11 IST)
अभिनेता वरुण धवन आपल्या खासगी आयुष्याबद्दल फारसा बोलत नाही. पण वरुणला एक मुलगी आवडते हे त्याने कबूल करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
 
सलग पाच हिट चित्रपट दिल्यानंतर वरुणने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांना सांगितल्या असून रुपेरी पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स केल्यानंतर वरुण खर्‍या आयुष्यातही रोमँटिक झाला आहे. एका सिने मासिकाला दिलेल्या मुलाखतीत वरुणने, ‘मी एक मुलगा आहे, मी सरळ मार्गी आहे. अर्थात मी एका मुलीच्या प्रेमात पडलो आहे. मी तिच्याशी जेव्हा लग्न करेन किंवा लग्नाचे ठरवेन तेव्हा तिच्याविषयी सगळे सांगेन.’ 
 
त्या मुलीविषयी अधिक तपशील विचारला असता तो इतकेच म्हणाला, ‘मी फक्त एवढेच सांगेन की ती याच शहरातील आहे.’ काही दिवसांपूर्वी वरुण एका मुलीसोबत डेटिंग करीत असल्याची बातमी पसरली होती. ती बातमी खरी असू शकते असेच त्याच्या या बोलण्यावरून वाटते आहे. वरुन धवन चमकत्या मुंबई नगरीची ड्रेस डिझायनर नताशा दलालच्या प्रेमात असल्याची ती खबर होती.

वेबदुनिया वर वाचा