रेखासोबत काम करत नाहीः अमिताभ

PTI
आपण रेखा सोबत 'मर्मयोगी' चित्रपट करीत नसल्याचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केले आहे. अमिताभ यांनी म्हटले आहे, की मला अशा प्रकारच्या कोणत्याही चित्रपटा बद़दल काहीही माहीत नाही.

अभिषेकने 'द्रोणा'च्या सेटवर एका स्पॉटबॉयच्या कानशिलात लगावल्याच्या वृत्ताचेही अमिताभने खंडन केले आहे. अमिताभ आपल्या पुढच्या चित्रपटासाठी दाढी काढून टाकणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. 'चीनी कम'चे दिग्दर्शक बाल्की यांनी अमिताभला त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी दाढी काढण्याचा सल्ला दिला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन व विद्या बालन काम करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा