बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या घरी नवा पाहुणा आला आहे. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया हिने मंगळवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. जेनेलिया आणि बाळ सुखरुप असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या गोड बातमीने देखमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण आहे. रितेश याने 'ट्विटर'वरून ही गूड न्यूज दिली आहे. 'It's a BBOOOOYYYYYY!!!!!!!!' असे रितेश याने 'ट्विट' केले आहे.