राधिका आपटेच्या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर लाँच

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (10:43 IST)
मुंबई- अभिनेत्री राधिका आपटेची न्यूड क्लिप आणि छायाचित्रे काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर व्हायरल झाली होती. त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला होता. अनुराग कश्यप यांच्या शॉर्ट फिल्ममधील राधिकाची ही क्लिप आणि छायाचित्रे होती. मॅडली- लव्ह इज मॅड हे या शॉर्ट फिल्मचे नाव आहे. 
 
न्यूड क्लिप व्हायरल झाल्याने शूटिंगच्या काळातच ही शॉर्ट फिल्म चर्चेत आली होती. आता त्या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. जगभरातील नावाजलेल्या सहा दिग्दर्शकांनी एकत्र येऊन ही शॉर्ट फिल्म तयार केली आहे. या सहाही दिग्दर्शकांनी आपापल्या देशातील आधुनिक प्रेमाला आपल्या पद्धतीने चित्रित करण्याचा प्रयत्न या शॉर्टफिल्ममध्ये केला आहे.

वेबदुनिया वर वाचा