प्रसिद्धीझोतात येण्यासाठी अनेक कलाकारांना कास्टिंग काउचसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. काही कलाकार याबाबत उघडपणे बोलतात तर काहीजण अशा गोष्टी गुप्त ठेवणेच योग्य समजतात. टेलिव्हिजन क्षेत्रातून प्रसिद्धीस आलेली आणि आता बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री सुरवीन चावला हिलाही कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते.