रस्त्यावर बसून सोनूने म्हटले गाणे, कोणी त्याला ओळखले नाही Video

बुधवार, 18 मे 2016 (12:24 IST)
सिंगर सोनू निगमचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यात तो स्टेजवर नसून जुहू भागातील रस्त्याच्या बाजूला बसून गाणे म्हणत होता. 
 
या व्हिडिओला द रोडसाइड उस्ताद नाव देण्यात आले आहे आणि याला बीइंग इंडियन नावाच्या यू ट्यूब चॅनलने प्रसिद्ध केले आहे. हा व्हिडिओ प्रयोग म्हणून बनवण्यात आला आहे की मुंबईच्या व्यस्त रस्त्यांवर एका म्हातार्‍या गायकाबद्दल लोकांची प्रतिक्रिया कशी असते. 
 
यातून बरेच लोक सोनू निगमाचे गाणे ऐकण्यासाठी थांबतात जरूर पण कोणी त्याला ओळखू शकले नाही. हार्मोनियम घेऊन सोनू निगमने ”कल हो ना हो”गीत देखील गायले. सोनू निगमने म्हटले की त्याने ह्या गोष्टीकडे लक्ष्य दिले नाही की तो कसा दिसेल आणि त्याच्या कुशल मेकअपमुळे लोकांनी त्याला ओळखले देखील नाही. 

वेबदुनिया वर वाचा