रणबीर कपूर करणार राजेश खन्नांचा रोल

मंगळवार, 15 एप्रिल 2014 (14:35 IST)
बॉलिवूडचा सुपरस्टार असा बहुमान मिळवणार्‍या अभिनेता राजेश खन्ना यांच्या निधनाला दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. राजेश खन्ना यांनी त्यांच्या उमेदीच्याकाळात इत्तेफाक हा सिनेमा केला होता. त्यावेळी हा सिनेमा खूप गाजला होता. त्यामुळे आता या सिनेमाचा रिमेक दिग्दर्शक रवी चोप्रा यांचा मुलगा अभय चोप्रा करीत आहे. या रिमेकमध्ये राजेश खन्नाची भूमिका रणबीर साकारणार आहे.

बॉलिवूडमधील एकेकाळी गाजलेली भूमिका पुन्हा नव्याने साकारायला मिळाल्याने अभिनेता रणबीर कपूर सध्या खूश दिसत आहे. राजेश खन्ना यांचा रोल करावयास मिळणे हा अभिनेता रणबीर कपूर त्याचे भाग्य समजत आहे. तसे पहिले तर आतापर्यंत बॉलिवूडमध्ये रिमेकना बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करता आला नव्हता.

त्यातच आता अभय चोप्रा इत्तेफाकचा रिमेक बनवत आहे. रणबीर कपूर यांची या रिमेकमधील राजेश खन्ना यांच्या भूमिकेसाठी निवड निश्चित झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा