‘कोच्चडियान’ फेम दिग्दर्शिका सौंदर्याने स्वत: ट्विटरवर ही गोड बातमी दिली आहे. तुम्हा सर्वाचे आमच्यावर खूप प्रेम आहे. त्याबद्दल आभार. घरात सर्वाना नव्या पाहुण्याची प्रतीक्षा लागली आहे. तुमचे आशीर्वाद असेच राहो. मातृत्वाच्या अनुभवासाठी उत्सुक असल्याचे सौंदर्याने ट्विट करून सांगितले.