दिवसेंदिवस प्रदर्शनापूर्वीच चित्रपट लीक होण्याचे प्रमाण वाढत चालले असून सैराट,सुलतान, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती आणि असे अन्य काही चित्रपट लीक झाल्याने त्यांच्या बॉक्स ऑफीस कलेक्शनवर बराच परिणाम होताना दिसत आहे. त्यातच आता सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित कबाली चित्रपटही लीक झाल्याचे वृत्त आहे. काही संकेतस्थळांवर जगभरात चर्चा असलेल्या या चित्रपटाची कॉपी डाउनलोडसाठी उपलब्ध असल्याचे वृत्त आहे. पण हा चित्रपट अद्याप शेअरींग साइट असलेल्या टोरन्टवर आलेला नाही.