रजनीकांतचे चरित्र 12-12-12ला होणार प्रकाशित!

वेबदुनिया

शनिवार, 21 जानेवारी 2012 (14:53 IST)
सुपरस्टार रजनीकांतचे चरित्र 12-12-12च्या मुहूर्तावर म्हणजे वर्षीच्या 12 डिसेंबरला प्रकाशित होणार आहे. हे चरित्र समीक्षक नमन रामचंद्रन यांनी लिहिले आहे. पेंग्विन बुक्स इंडियाकडून हे चरित्र पुस्तक प्रकाशित होणार आहे. रजनीकांतचे हे पहिले आणि अधिकृत चरित्र असेल. 12 डिसेंबरला रजनीकांतचा 62 वा वाढदिवस आहे.

त्याचेही औचित्य यावेळी साधण्यात येईल. या पुस्तकात रजनीकांतची अनेक दुर्मीळ छायाचित्रेही असणार आहेत. बसमध्ये कंडक्टरची नोकरी करीत असलेल्या एका मराठी तरुणाने अंगभूत गुणांच्या जोरावर किती मोठी मजल मारली, याचे चित्र या पुस्तकातून स्पष्ट होऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा