यामुळे अस्वस्थ होतात दीपिका, करीना आणि विद्या

अनेक लोकांना ओबसेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर असतं ज्यामुळे त्यांना काही गोष्टी त्यांच्या आवडीप्रमाणे झाल्याच पाहिजे असे वाटत असते. असे न झाल्यास ते अस्वस्थ होतात. काही बॉलीवूड स्टारही याला बळी पडलेले असतात. पाहू असे स्टार आणि त्यांच्या अस्वस्थतेचे कारण:

दीपिका पादुकोण: योग्या जागी योग्य वस्तू
दीपिका पादुकोण वस्तूंची जागा बदल्यावर अस्वस्थ होते. तिला पसारा मुळीच आवडत नाही. कित्येकदा ती आपल्या मित्र-मैत्रिणींच्या वस्तूही जागेवर ठेवते.
 

करीना कपूर खान: लठ्ठपणा नको
 
करीना कपूर खानला मेंटेंड फिगर आवडतं. तिने कित्येक किलो वजन कमी केलेले आहे. लठ्ठपणा वाढल्यास ती अस्वस्थ होते. म्हणूनच ती हार्ड वर्क आऊट आणि योगा करते.

विद्या बालन: स्वच्छतेचं वेड
विद्या बालनला स्वच्छता पसंत आहे. तिचं घर असो वा वॅनिटी वॅन, तिला सर्वीकडे स्वच्छता हवी असते. ती घाण आणि धूळ अजिबात आवडत नाही.‍ कित्येकदा ती स्वत: साफसफाईत गुंतून जाते.

वेबदुनिया वर वाचा