मॅक्सिमच्या कव्हर पेजवर रिचा

शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (14:54 IST)
अभिनेत्री रिचा चड्ढाला मॅक्सिम मासिकाने कव्हर पेजवर स्थान दिले आहे. मासिकाचा हा अंक सप्टेंबर महिन्यासाठी आहे. मासिकाच्या लाँचिंगसाठी रिचा एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती.

या कव्हर पेजवर रिचा चड्ढा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यावर ‘Richa Chadda LIKE YOU'VE NEVER SEEN HER!’लिहिलेले आहे. या अंकाची थीम सेक्स अँड रिलेशनशिपवर आधारित आहे. या इव्हेंटमध्ये रिचा पिंक फ्लोरल आउटफिटमध्ये दिसून आली. या इव्हेंटमध्ये सुमोना चक्रवर्ती, कायनात अरोरा, करिश्मा केटक आणि इतर मॉडेल्ससुध्दा उपस्थित होत्या. रिचा चड्ढा सध्या ‘तमंचे’या आगामी सिनेमाचे प्रमोशन करत आहे. हा सिनेमा 19 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा