मी फरहानची फॅन गर्ल: आदिती

शनिवार, 26 डिसेंबर 2015 (12:39 IST)
अभिनेत्री आदिती राव हैदरी वजीर चित्रपटात फरहान अख्तरसोबत भूमिका करीत आहे. तिला फरहानसोबत वावरताना फॅन गर्ल असल्याचे वाटते. थ्रिलर ड्रामा असलेल्या या चित्रपटात ती फरहानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

विधू विनोद चोप्रा यांच्या वजीर चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही महत्वाची भूमिका आहे. बिजॉय नंबियार याचे दिग्दर्शन करती आहेत. आदिती राव म्हणते, बॉलीवूडच्या अशा मोठ्या लोकांत मी कधी वाढलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत सेटवर वावरताना भारी वाटते.

वेबदुनिया वर वाचा