कंगनाने सांगितले की तिची बहीण रंगोली हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला एक मुलगा झाला होता पण दुर्दैवाने तो दहा दिवसातच वारला. त्यामुळे माझ्या पालकांना धक्का बसला. पण रंगोली जन्माला आली आणि पुन्हा उत्साह पसरला. पण माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईसाठी हे स्वीकार करणे फार कठिण जातं होते की घरात पुन्हा एक मुलगी जन्माला आली. मला या गोष्टी अगदी स्पष्ट लक्षात आहे कारण घरात नातेवाइक गोळा झाल्यावर नेहमी हा विषय निघायचा की मी त्यांची नको असलेली मुलगी आहे.