मीही ठरले वर्णभेदाची शिकार

सोमवार, 14 डिसेंबर 2015 (11:43 IST)
अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचं प्रतिनिधित्व करणार्‍या अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच एक धक्कादायक खुलासा केलाय. ‘मीदेखील वर्णभेदाची शिकार ठरली’आहे असं वक्तव्य सोनमनं केलंय. 
 
एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना 30 वर्षीय सोनमनं हा खुलासा केलाय. भारतातल्या ‘असहिष्णुते’वरही तिनं या कार्यक्रमात तिचं मत मांडलंय.’ असहिष्णुता हा खूप व्यापक शब्द आहे. मला अनेक देशांत वर्णभेदाचा सामना करावा लागला. ते सावळ्या रंगाची त्वचा पाहतात आणि तुमच्याबद्दल अगोदरच धारणा करून घेतात. जेव्हा केव्हा मी परदेशात जाते तेव्हा लोकांची अगोदरच तुमच्याबद्दल धारणा बनलेली असते. जसं की तुम्ही नेहमी पडद्यात राहतात किंवा तुमचे आई-वडील खूप रुढीवादी आणि परंपरावादी आहेत’ असं यावेळी सोनमनं म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा