माझ्या मुलीला दुसरे सांभाळतील म्हणून मी तिला जन्म दिला नाही : ऐश्वर्या राय

मंगळवार, 17 मे 2016 (17:32 IST)
नोकरी करणार्‍या आयांसाठी नेहमी त्यांचे मुलं फार मोठी जबाबदारी असतात. नेहमी काम करणार्‍या आयांना आपल्या मुलांना डे केअर सेंटर मध्ये ठेवावे लागते किंवा दुसर्‍यांच्या भरवशावर सोडून यावे लागते. पण ऐश्वर्या राय बच्चन ही जबाबदारी फारच व्यवस्थितपणे पार पाडत आहे.   
 
ती आपल्या कामाच्या जबाबदार्‍यांना ओळखते म्हणून अराध्या आणि कामामध्ये बॅलेस ठेवून चालते. टीव्ही शो 'यार मेरा सुपरस्टार'मध्ये ऐश्वर्याने आपल्या आई झाल्यानंतरचे अनुभव शेयर केले. तिने सांगितले की जर मला शूटसाठी जायचे असेल तर मी नेहमी या प्रयत्नात असते की अराध्याला आधी शाळेत सोडून मी सेटवर जाऊ.  
 
मी पूर्ण प्लान तिच्यानुसार बनवते. मी त्या सर्वांना धन्यवाद देत आहे ज्यांच्यासोबत मी काम करते आणि ते सर्व लोक माझी फारच मदत करणारे आहे. मी आई झाली आणि त्याचा पूर्ण आनंदही घेत आहे.  
 
मी आपल्या मुलीला यासाठी जन्म नाही दिला की तिला दुसरे लोक सांभाळतील. आई झाल्यावर मी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. सांगायचे म्हणजे की ऐश्वर्याचे चित्रपट 'सरबजीत' 20 मे रोजी रिलीज होत आहे.  

वेबदुनिया वर वाचा