बॉलिवूडमध्ये सोनाक्षीला नाही मैत्रीण

गुरूवार, 5 जून 2014 (15:24 IST)
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने खूप सिनेमात काम केले आहे. मात्र तिची बॉलिवूडमध्ये खास अशी कोणतीच मैत्रीण नाही. त्याचे कारण म्हणजे अनेक सिनेमात काम करीत असताना तिला अभिनेत्रीसोबत काम करता आले नाही; त्यामुळे तिला आतापर्यंत एकही चांगली मैत्रीण मिळाली नाही. याबाबत सोनाक्षी म्हणाली, बॉलिवूडमध्ये मला आतापर्यंत चांगला दोस्त मिळालेला नाही.

आतापर्यंत काम केलेल्या सिनेमात मी अभिनेत्रीसोबत काम केलेले नाही. त्यामुळे मला बराच काळ शोध घेऊन चांगली मैत्रीण मिळू शकलेली नाही. त्यामुळे आगामी काळात मी मैत्रिणीचा शोध सुरुच ठेवणार आहे. आगामी काळात येत असलेला माझा ‘अँक्शन जैक्शन’ हा सिनेमा मल्टी-स्टारर आहे. त्याशिवाय ‘हॉलिडे : ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी’ या सिनेमात सोनाक्षी अक्षयकुमारसोबत झळकणार आहे. त्यामध्ये सोनाक्षी इंटर-कॉलेजेस बॉक्सर म्हणून काम करणार आहे. तिने बॉक्सर विजेंदर सिंहची भेट घेतली होती.

वेबदुनिया वर वाचा