बेबी चित्रपटाचा समावेश ‘ऑस्कर लायब्ररी’मध्ये

सोमवार, 20 एप्रिल 2015 (10:49 IST)
प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवलेल्या अक्षयकुमारच्या ‘बेबी’ चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘बेबी’ चित्रपटाच्या पटकथेचा समावेश ‘ऑस्कर’ अर्थात द अँकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टस् अँण्ड सायन्सच्या लायब्ररीमध्ये केला जाणार आहे.

‘द अँकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टस् अँण्ड सायन्स’तर्फे ‘बेबी’च्या पटकथेचा समावेश त्यांच्या कलेक्शनमध्ये ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली होती. बेबीमध्ये अक्षयकुमारसोबत अनुपम खेर, राणा डुग्गुबाटी यांनी अभिनय केला होता. ‘मार्गारेट हेरिक लायब्ररी’मध्ये जागतिक स्तरावरील उत्तम चित्रपटांच्या पटकथा जतन करून ठेवल्या जातात. दरवर्षी जगभरातील काही मोजक्या चित्रपटांनाच हा मान मिळतो, यंदा यात बेबी चित्रपटाचीही वर्णी लागलेली आहे. चित्रपटांचे अभ्यासक, विद्यार्थी, दिग्दर्शक, अभिनेते आणि अन्य तज्ज्ञ अशा पटकथा संशोधन किंवा तत्सम कारणांसाठी हाताळू शकतात. यापूर्वी देवदास, गुजारिश, राजनीती, अँक्शन रिप्ले, हॅपी न्यू इयरसारख्या चित्रपटांचा समावेश ऑस्करच्या लायब्ररीत झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा