बिपाशा- करणची डिनर डेट

मंगळवार, 28 एप्रिल 2015 (11:19 IST)
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांच्या मैत्रीची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये रंगतेय. अलोन चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर या दोघांना अनेकदा एकत्रच पाहिलं जातंय. नुकतंच मुंबईतील वांद्रे भागात एका रेस्टॉरंटमध्ये दोघं डिनर डेटला गेले होते. एकमेकांची कंपनी हे दोघं चांगलीच एन्जॉय करताना दिसले.

जॉन अब्राहमनंतर बिपाशा बासूची हरमन बावेजासोबत एंगेज असल्याची चर्चा होती. काही काळानंतर दोघं लग्न करणार अशाही बातम्या आल्या. बिपाशाला अनेकदा हरमनच्या कुटुंबीयांसोबतही पाहिलं गेलं. मात्र आता हे दोघं वेगळे झाले आहेत. तर दुसरीकडे करण ग्रोव्हरनं अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केलं होतं. नंतर त्याचं अफेअर कोरिओग्राफर निकोलसोबत होतं. मग त्यानं छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत विवाह केला. काही दिवसांपूर्वीच ते वेगळे झाले आहेत.

नुकताच करणच्या बर्थडेला बिप्स आणि मित्रांनी पार्टी केली होती. सोबतच त्यांना अनेक अँवॉर्डस् शोमध्येही एकत्र पाहिलं जातंय.

वेबदुनिया वर वाचा