बिकिनीबद्दल प्रश्न विचारल्याने चिडली सोनाक्षी सिन्हा

बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (12:29 IST)
सोनाक्षी सिन्हा ट्रीट फॉर टॅटमध्ये विश्वास ठेवते. ट्विटरवर ती आपल्या चाहत्यांसोबत चॅटिंग करत होती. तेव्हाच एका चाहत्याने विचारले की 'तू तुझे शरीर केव्हा दाखवणार आहे? तू बिकिनी केव्हा परिधान करणार आहे?' बस मग काय, सोनाक्षीने लगेचच म्हटले की 'हे प्रश्न तू आपल्या आई किंवा बहिणीला विचार. मला जाणून घ्यायचे आहे की याबद्दल त्याचं काय उत्तर असेल. ' 
 
सोनाक्षीचे म्हणणे आहे की लोकांना कळायला पाहिजे की कुठल्या प्रकाराचे प्रश्न विचारायला पाहिजे. जर या मुलाने माझ्यासमोर येऊन हा प्रश्न विचारला असता तर त्याला झापड मारला असता. ऑनलाईनवर माझं उत्तर झापड सारखंच आहे. या प्रकारे पुरुषांना शिकवायला पाहिजे की महिलांसोबत कसा व्यवहार करायला पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा